गुन्हेजळगाव जिल्हा

जळगाव शहरात एकाच दिवशी सात दुचाकी लांबविल्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२४ । दुचाकी चोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नसून यातच जळगाव शहरातील विविध भागातून एकाच दिवसात तब्बल ७ दुचाकी चोरीस गेल्या, यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सात गुन्हे दाखल झाले आहे.

मेहरूण तलाव परिसरातील रहिवासी अमित बाराणी यांनी सिंधी कॉलनीतील लक्ष्मी अपार्टमेंटसमोर १२ मे रोजी रात्री ९.४५ वाजता त्यांची दुचाकी (क्रमांक एमएच-१९, बीव्ही-५७३५) उभी केली होती. ते काम आटोपून रात्री १९ वाजता आल्यावर त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे दिसून आले. मोहाडी रोड येथील अनिल साहित्या यांनी २० में रोजी सायंकाळी ६.०५ वाजता श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानासमोरील दुकानाजवळ त्यांची दुचाकी (क्रमांक एमएच-१९, इबी-६४७४) उभी केली होती. २० मिनिटांत त्यांची दुचाको चोरून नेली.

हाजी अहमद नगरातील वसिम मुक्तार यांची दुचाकी (क्रमांक एमएच-४७, एक्यू ६८३६) १७ मे रोजी रात्री ट्रान्सपोर्टनगरातून लंपास केली. शिरसोली येथील जगदीश भुते यांनी १७ रोजी रात्री ८ वाजता घरासमोर दुचाकी (क्रमांक एमएच- १९, सीए २६४४) उभी केली होती. मध्यरात्री ती चोरून नेली. शिरसोलीतीलच नितीन काटोले यांची दुचाकी (क्रमांक एमएच १५ सीयू ५७९२) १८ मे रोजी सायंकाळी घरासमोरून लंपास केली, सावखेडा शिवारातील विकास पाटील यांची दुचाकी (क्रमांक एमएच-१९, एएल- ९५६७) १९ रोजी मध्यरात्री घराच्या प्रांगणातून चोरीला गेली.

बांधकाम व्यावसायिक शुभम जयकर यांची दुचाकी (एमएच-१९, पाझेड-२३०) त्यांच्या नेहरू नगरातील बांधकाम कार्यालयाच्या बाहेरून २० मे रोजी मध्यरात्री चोरून नेली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button