⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | वाणिज्य | विराट-अनुष्काची लागली लॉटरी ; ‘या’ शेअरमध्ये 271 टक्क्यांचा तगडा रिटर्न मिळाला

विराट-अनुष्काची लागली लॉटरी ; ‘या’ शेअरमध्ये 271 टक्क्यांचा तगडा रिटर्न मिळाला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२४ । क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीची लॉटरी लागली आहे. विराट आणि अनुष्काने गो डिजिट कंपनीत गुंतवणूक केली होती. या कंपनीने 15 मे रोजी 2,614.65 कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च केला.आता गो डिजिट कंपनीचा शेअर, बाजारात सूचीबद्ध झाला असून आयपीओला एकूणच 9 पटीहून अधिकची बोली लागली होती.

कंपनीचा शेअर 272 रुपये किंमतीला देण्यात आले. आज BSE वर त्याची किंमत 281.10 रुपये आणि NSE वर 286 रुपयांवर एंट्री झाली. विराट-अनुष्काला ताबोडतोब 5.15 टक्के लिस्टिंग गेन मिळाला. बाजारात दाखल होताच या शेअरने उसळी घेतली. हा शेअर BSE वर 291.45 रुपयांच्या अप्पर सर्किटवर पोहचला. म्हणजे आयपीओ गुंतवणूकदारांना आता 7.15 टक्क्यांचा फायदा मिळाला.

गो डिजिटने DRHP फाईल केलेले आहे. त्यानुसार, विराट कोहलीने फेब्रुवारी 2020 मध्ये या कंपनीत 2 कोटी रुपये गुंतवले होते. त्याचे कंपनीत 2,66,667 इक्विटी शेअर आहेत. तर पत्नी अनुष्का शर्माने 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तिच्याकडे गो डिजिटचे 66,667 इक्विटी शेअर आहेत. या दोघांनी 75 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने गुंतवणूक केली होती. आता शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर या 2.50 कोटी रुपयांच्या बदल्यात त्यांना 9,53,33,524 कोटींचा रिटर्न मिळाला आहे. म्हणजे गुंतवणुकीवर 271 टक्क्यांचा तगडा रिटर्न मिळाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.