जळगाव लाईव्ह न्यूज | 23 मे 2024 | जळगावात गुन्हेगारी पुन्हा डोक वर काढताना दिसत असून याच दरम्यान, जळगाव शहर खुनाच्या घटनेनं हादरलं आहे. जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे घडली. किशोर अशोक सोनवणे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून या हत्येचा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याबाबत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर सोनवणे हा आपला परिवारासह वास्तव्याला आहे. किशोर सोनवणे काही जणांसोबत जुना वाद होता. या वादातून हॉटेल भानू येथे किशोर सोनवणे हा जेवण करण्यासाठी बसलेला असतांना अज्ञात काही हल्लेखोरांनी किशोर सोनवणे याच्यावर रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
यावेळी रक्ताच्या थारोळ्यात किशोर सोनवणे याचा मृतदेह पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनांसाठी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून इतर मारेकरी फरार झाले आहे. या खून प्रकरणात अजून किती जणांचा समावेश आहे. याची चौकशी सुरू आहे.