जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका पार पडल्या असून येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होईल. त्यापूर्वी राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांच्या शब्दांना धार चढली आहे. दरम्यान, पक्ष चोरीचा, दरोडा घातल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नुकताच केला होता. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटीलांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे.
‘आयुष्यात शिवसेना तुला माहिती आहे का चोट्या तुझ्यावर एक तरी केस आहे का?’ अशी जहरी टीका गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर केली. बाळासाहेब म्हणायचे ज्यांच्यावर केस नाहीत तो शिवसैनीक नाही, असाही टोला त्यांनी राऊत यांना लगावला. यापूर्वी खानदेशीमधील सभांमध्ये संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. पान टपरीवर बसून नाही तर 24 तास जनतेची सेवा केली म्हणून आमदार झालो, तू काय केलं? असा निशाणा गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर साधला होता.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. उध्दव ठाकरे आता पंजाला मत देणार आहेत, ज्या काँग्रेस सरकारने आमच्यावर, शिवसैनिकांवर केसेस टाकल्या. त्यांना ते मतदान करणार आहेत. बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल, असा सवाल त्यांनी केला. आमचा मुख्यमंत्री साधा आहे, रिक्षावाला आहे. गरीबावाला मुख्यमंत्री झालेला यांना पटतं नाही. बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांनी जे काम त्यांनी केलं नाही ते केलं. ग्रामपंचायतीत सुध्दा सरपंचचा उमेदवार लागतो,आमच्याकडे टॉप टू बॉटम एकच उमेदवार आहे. आमच्याकडे नरेंद्र दामोदरदास मोदी आहेत. ‘गद्दारों कें लिए कहर है मोदी’, असा टोला त्यांनी लगावला.