जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२४ । भारतात सोन्या आणि चांदीच्या किंमती पुन्हा एकदा भरारी घेताना दिसत आहेत. गुरुवारी भारतीय फ्युचर्स मार्केट (MCX) वर चांदीच्या किमतीने उच्चांक पातळी गाठली. काल दिवसभरात चांदीच्या दरात तब्बल १५०० रुपयापर्यंतच्या वाढीसह ८७ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला. दुसरीकडे सोन्याच्या किमतीत देखील वाढ झाली. आज देखील MCX सकाळच्या सत्रात दोन्ही धातूंचे दर वाढलेले दिसून आले. सर्वसामान्य ग्राहकांना दरवाढीमुळे जादा पैसा मोजावा लागणार आहे.
भारतीय फ्युचर्स मार्केट (MCX)
भारतीय सराफा बाजारात MCX वर शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोन्याचा भाव ३० रुपयांनी वाढून ७३,००८ रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास व्यवहार करत होता तर त्याचवेळी, चांदीचा दर १२० रुपयांच्या वाढीसह ८७,४२० रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. गुरुवारीचांदीने फ्युचर्स मार्केटमध्ये एक नवीन विक्रम नोदंवला. गुरुवार चांदीने ८७,२१७ रुपये प्रति किलोचा विक्रम केला
जळगावातील दर
गुरुवारी जळगाव सुवर्णपेठेत देखील चांदीच्या दरात तब्बल १ हजार रुपयापर्यंतची वाढ दिसून आली. तर सोने दरात ४०० रुपयाची वाढ झाली. यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७३,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. दुसारिखे चांदीचा दर ८६००० रुपयावर गेला आहे.