जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२४ । देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. काही पक्षांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यातच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्याला ‘मोदी की गारंटी’ हे नाव देण्यात आले आहे. यामध्ये अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जानेवारी 2024 रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर 15 लाखांपेक्षा जास्त सूचना आल्या होत्या.
भाजपच्या या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आले आहेत. त्यात गरिबांना पुढील ५ वर्षे मोफत धान्य मिळणार आहे. जेनरीक औषधी ८० टक्के स्वस्त देण्यात येणार आहे, ही आश्वासने आहे. तसेच ७० वर्षांवरील लोकांसाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणण्यात येणार आहे. प्रत्येकाला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहे. गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितले.
काय आहेत महत्वाच्या घोषणा
पुढील पाच वर्षे गरीबांना मोफत धान्य
आणखी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधणार
७० वर्षांवरील लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहचवणार
मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यंत वाढवणार
‘पीएम किसान’ योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार
महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार
कोट्यवधी लोकांची वीजबिल शून्य करणार
पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल
5G चा विस्तार करण्यात येणार असून 6G वर काम सुरु