⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

सुरत-ब्रह्मपूर दरम्यान विशेष एक्स्प्रेस धावणार ; भुसावळसह ‘या’ स्थानकांवर असणार थांबा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२४ । सध्या उन्हाळी सुट्ट्यामध्ये रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या गर्दी दिसून येत आहे. प्रवाशांची होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून विविध मार्गावर विशेष गाड्या चालविल्या जात आहे. अशातच पश्चिम रेल्वेने सुरत -ब्रह्मपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष ही गाडी जळगाव भुसावळ मार्गे धावणार असल्याचे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.

गाडी क्रमांक 09069 सुरत – ब्रह्मपूर स्पेशल दर बुधवारी 14.20 वाजता सुरतहून निघेल आणि शुक्रवारी ब्रह्मपूरला 01.15 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 17 एप्रिल 2024 ते 26 जून 2024 पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09070 ब्रह्मपूर – सुरत स्पेशल ब्रह्मपूरहून दर शुक्रवारी 03.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.45 वाजता सुरतला पोहोचेल. ही ट्रेन 19 एप्रिल 2024 ते 28 जून 2024 पर्यंत धावेल.

या स्थानकांवर आहेत थांबा
ही गाडी नंदुरबार, धरणगाव, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, बल्हारशाह, वारंगल, विजयवाडा, एलुरु, राजमुंद्री, समलकोट, दुव्वाडा, पेंदुर्ती, कोट्टावलासा, विजयनाग्राम, श्रीकाकुलम रोड आणि पलासा स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल.

दरम्यान, या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डब्यांचा समावेश आहे.