गुन्हेजळगाव जिल्हा

तरुणाच्या खुनाने जळगाव हादरले ; चौघे संशयीत पोलिसांच्या ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२४ । जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय तरुणाला जबर मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आलीय. ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-३५) असे मयताचे नाव असून. चोरीच्या संशयावरून त्याला चौघांनी मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

याबाबत असे की, जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी या तरुणाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चोरी केल्याचा शेजाऱ्यांना संशय होता. आज मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास चौघे दुचाकीवर बसवून ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन गेले. दुपारी २ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याचा मृतदेह असोदा शिवारात पडलेला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मिळाली. मयताच्या अंगावर चटके दिल्याच्या खुणा असून हात आणि पायाला दुखापत केली असल्याचे दिसून येत आहे.

घटनेची माहिती कळताच लागलीच शनिपेठ, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी लागलीच ४ संशयितांना देखील ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button