⁠ 
रविवार, मे 19, 2024

Jalgaon Gold Rate : सोन्यात किंचित दिलासा, पण आगामी दोन दिवसात भाव पुन्हा वाढणार..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीने ग्राहकांचे कंबरडे मोडली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने किमतींनी नवीन उच्चांकी दर गाठला. मात्र, दुसऱ्या दिवशी सोने नरमले. किंमती कमी झाल्या. पण सोन्याचा भाव अजूनही गगनालाच भिडलेले आहेत.

सोने दराने गेल्या मार्च महिन्यात २९, २८ व ३१ मार्च रोजी उच्चांकी पातळी गाठल्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा ८०० रुपयांची वाढ होत सोने ६९,४०० या आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले.

मात्र दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. सोने ४०० रुपयांनी घसरले आहे. यामुळे आता जळगावच्या सुवर्णनगरीत २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६९००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदी स्थिर दिसून आली. सध्या एक किलो चांदीचा दर 77000 रुपयांवर आहे. आगामी दोन दिवसांत सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. ही दरवाढ दीड ते अडीच हजारांच्या घरात असू शकते.

दरम्यान, सोने दरावर डॉलर्सचे दर, अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदर कपात होण्याची शक्यता कमी व आंतरराष्ट्रीय जगतातील अस्थिरतेचे वातावरण याचे परिणाम होत असतात. सध्या असलेल्या डॉलर्सच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे सोन्याच्या दरात दीड हजार ते अडीच हजार रुपयांची वाढ होऊ शकते, असा अंदाज येथील आंतरराष्ट्रीय सोने बाजाराचे जाणकार तथा सराफा व्यावसायिक आदित्य नवलखा यांच्याकडून वर्तवण्यात आला.