⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | .. अन् प्रवाशांनी भरलेली बस शेतात शिरली ; रावेर तालुक्यातील घटना

.. अन् प्रवाशांनी भरलेली बस शेतात शिरली ; रावेर तालुक्यातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२४ । राज्य परिवहन महामंडळाच्या बसला रावेर तालुक्यातील विवरे गावाजवळ अपघात झाल्याची घटना समोर आलीय. एसटीला ट्रकने कट मारल्याने अनियंत्रित एसटी रस्त्याच्या खाली उतरून शेतात शिरली. त्यात १५ प्रवासी जखमी झाले. पैकी ५ गंभीर जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक दरम्यान विवरे पारशा नाल्याच्या पुढे स्मशानभूमीजवळ रावेर आगाराची धुळे बन्हाणपूर बस (एम. ४० वाय ५९९७) विवरे बुद्रुक येथून रावेरकडे येत होती. समोरून येणाऱ्या ट्रक (एचआर, ५५. एक्स २९८३) ने अचानक कट मारला, त्यात अनियंत्रित झालेली बस बाजूच्या शेतात शिरली.

ट्रकमुळे बसचा सुमारे १० फूट लांब पत्रा कापला गेला, यावेळी बसमध्ये ४९ प्रवासी होते, अपघातात २० ते २५ प्रवासी जखमी झाले. पैकी १० किरकोळ, तर पाच गंभीर जखमी झाले. त्यांना मिळेल त्या वाहनाने व श्रीराम फाउंडेशनचे रुग्णवाहिका चालक प्रफुल्ल महाजन, विशाल राणे यांच्यासह नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी निंभोरा पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.