गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सेमीकण्डक्टर पॅकेजिंगवर मार्गदर्शन
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२४ । जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत काल विमर्श विकसित भारत २०४७ अंतर्गत सेमीकण्डक्टर पॅकेजिंगवर कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. राष्ट्राचे विकसित अर्थव्यवस्थेत परिवर्तन करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक धोरण उपक्रमांचा एक भाग म्हणून, गेल्या काही वर्षांपासून हा सार्वजनिक चर्चेचा विषय आहे. अमृत कालमधील आतापर्यंतच्या विकासाच्या उपलब्धी आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दृष्टीकोनाच्या संदर्भात, आपल्या शैक्षणिक कॅम्पसमध्ये विविध क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक आणि समान वाढ आणि विकास यावर विचार करणे आणि चर्चा करणे आवश्यक आहे. या संदर्भातच अमृत काल विमर्श: विकसित भारत२०४७ या थीमवर व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी देशाच्या विविध भागांतील महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अमृत काल विमर्श विकसित भारत २०४७ अंतर्गत मार्गदर्शन आयोजित केले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जावेद शेख (सीनियर थर्मल आर्किटेक्ट गुगल सिलिकॉन लॅब बेंगलोर) तसेच गोदावरी फाउंडेशन च्या सदस्या भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी),महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे, प्रा. हेमंत इंगळे प्रा. शफिकुररहमान अहमद (समन्वयक), सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विकसित भारत २०४७ बद्दल मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी सत्य परिस्थितीत भारत हा ग्लोबली डेव्हलप होत आहे. व इकॉनॉमी मध्ये भारत जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. आज जर इकॉनॉमी मध्ये भारताला वरच्या क्रमावर जायचं असेल तर शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणजेच अमृत काल विमर्श होय. त्या मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन शासनामार्फत केले जात आहे.
त्यानंतर डॉ. जावेद शेख यांनी सेमीकंडक्टर पॅकेजिंग अंतर्गत फंडामेंटल अँड चॅलेंजेस फ्रॉम अकॅडमीक – इंडस्ट्रियल पर्स्पेक्टिव्ह फॉर विकसित भारत २०४७ या विषयावर मार्गदर्शन केले.त्यामध्ये त्यांनी इंडिया सेमीकंडक्टर मिशन याबद्दल सांगताना इंटरनेट ऑफ थिंग्स आणि सेमी कण्डक्टर एप्लीकेशन ची माहिती दिली. त्याचप्रमाणे सध्या परिस्थितीमध्ये मार्केटचा कल सेमीकंडक्टरच्या दृष्टीने कसा आहे याबद्दल ग्राफ च्या माध्यमातून समजावून सांगितले. पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस चे फीचर्स समजावून सांगितले व त्या माध्यमातून वेगवेगळ्या टॅबलेट लॅपटॉप यांच्या सिस्टीम डिटेल्स बद्दल तसेच महत्त्वाच्या पार्ट संदर्भात बोलताना त्यांनी पीसीबी डिझाईन याबद्दल संपूर्ण माहिती देताना छोट्या छोट्या पार्ट संदर्भात सांगितले. पीसीबी डिझाईन करताना चे चॅलेंजेस त्यांनी क्रमवारी करून सांगितले. व या अडथळ्यांना कशा प्रकारचे सोल्युशन असते सेमीकंडक्टर व्हेरिअबिलिटी आणि लिकेजेस या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालताना पॉवर आणि टेंपरेचर बद्दल सांगितले.
मोबाईल थर्मल डिझाईन बद्दल सांगताना कुलिंग टेक्नॉलॉजी मधील इनोवेशनची गरज तसेच हाय कंडक्टिव्हिटी ट्रेडर्स, टू फेज कूलिंग टेक्नॉलॉजी, हिट पाईप, वेफर चेंबर मेकॅनिझम, हायब्रीड मटेरियल, पॅकेजिंग ऑफ डिव्हाइसेस, थर्मल मॅनेजमेंट या महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला.त्यानंतर त्यांनी अकॅडमिक्स व इंडस्ट्री संलग्नतेबद्दल बोलताना विद्यार्थ्यांसाठी असलेल्या इंटर्नशिप, मिनी प्रोजेक्ट, मेजर प्रोजेक्ट या संदर्भात माहिती दिली.संपूर्ण सेशन नंतर विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा. शफिकुररहमान अहमद यांनी डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जय खडसे या विद्यार्थ्याने केले.