⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावचे माजी पोलीस अधीक्षकांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून एकाला ५० हजारात गंडविले

जळगावचे माजी पोलीस अधीक्षकांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून एकाला ५० हजारात गंडविले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून जळगाव शहरातील एकाला ५० हजारात गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, याबाबत सुपेकर यांना कळताच त्यांनी तक्रार नोंदवीत पुढील मित्रांची फसवणूक टाळली आहे. गेल्या महिन्याभरात अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या नावे देखील बनावट खाते तयार करण्यात आल्याचे समोर आले होते.

सोशल मीडियाचा गैरवापर

सध्या गुन्हेगारीचे स्वरुप बदलत चालले असून अगदी कमी श्रम व कमी वेळेत झटपट पैसे कमवण्यासाठी ऑनलाईन, सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे. फेसबुकवर बनावट खाते तयार करून त्याद्वारे संबंधित व्यक्तीच्या मित्रांना पैशांची मागणी करणे तसेच अश्लील फोटो, व्हिडिओ तयार करुन शेअर करण्याची धमकी देत लाखो रुपये खंडणी स्वरूपात उकळण्याचे नवे उद्योग सुरू झाले आहेत. यात विशेष करून उच्चभ्रू लोकांना टार्गेट केले जात आहे.

असाच प्रकार जळगावला पोलीस अधीक्षक राहिलेले डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या बाबतीत घडलेला आहे. डॉ.सुपेकर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक खाते तयार केले, त्यात या व्यक्तीने त्यांच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. या रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. पुण्यातील व्यापारी असलेल्या मित्राने खरच पैशाची गरज असेल म्हणून ५० हजार रुपये ऑनलाईन पाठवले. दरम्यान, सुपेकर यांच्या नावाने बनावट खाते तयार झाल्याचे जळगाव मधील मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ हा प्रकार सुपेकरांना कळविला.

सुपेकर यांनी त्याची दखल घेऊन शिवाजी नगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून हे खाते ब्लॉक केले. हे खाते फेक असून कोणीही यावर पैशाचा व्यवहार करू नये असे आवाहन त्यांनी केले.

त्यांचा हा मेसेज बघितल्यानंतर ज्या मित्राने ५० हजार रुपये पाठवले, त्यांनी  डॉ.सुपेकर यांच्याशी संपर्क केला व आपण ५० हजार पाठविल्याचे त्यांना सांगितले. सुपेकर यांनी तातडीने सूत्र हलविल्यानंतर नऊ हजार रुपये थांबवण्यात यश आले,अन्यथा ही रक्कमही सायबर गुन्हेगाराच्या हातात गेली असती. गेल्याच आठवड्यात जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील व रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक परदेशी यांच्या नावाचे बनावट खाते तयार करण्यात आले होते. जळगावला अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या नावाने बनावट तयार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.