जळगाव लाईव्ह न्यूज : २ मार्च २०२४ : सांयकाळचे आल्हाददायी वातावरण…प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदान, तरूणाईचा सळसळता उत्साहात येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन अंतरंग २ के २४ समारोप करण्यात आला. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अंतरंग २ के २४ वार्षिक स्नेहसंमेलन वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमकुमार पंडीत, प्राचार्य विशाखा गणवीर, प्राचार्य शिवानंद बिरादर,गोदावरी नर्सिंगचे प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, यांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांनी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्नेहसंमेलनातून विदयार्थ्यांच्या सुप्त गूणांना वाव मिळतो त्यामूळे सहभाग महत्वाचा असतो असे सांगितले. दिपप्रज्वलन व स्वागत गिताने प्रारंभ करण्यात आला. बीएससी व्दीतीय वर्षाच्या विदयार्थ्यांनी नृत्याविष्काराने स्नेहसंमेलनाची सूरूवात झाली. देशाच्या विविधतेचा अविष्कार पेहरावातून दिसून येत होता.
आदीवासी, बंजारा नृत्य कोरोनावर नाटीका, याचबरोबर माजी विदयार्थी आणि शिक्षकांच्या सहभागाने रंगत वाढत गेली. एकल व समृह गायनाला प्रेक्षकामधून वन्स मोअर वन्स मोअरच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंतीम वर्षाची स्वराज्य बॅच आणि प्रा. पियूष वाघ, प्रा. सुमैय्या, प्रा. अस्मिता जुमदे, प्रा. साक्षी गायकवाड, प्रा. कोमल काळे, प्रा. कल्याणी मेश्राम यांच्यासह गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.