⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | वाणिज्य | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! पीएम किसानचा 16वा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! पीएम किसानचा 16वा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२४ । पीएम किसान योजनेचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत असून या योजनेद्वारे दरवर्षी तीन टप्प्यात २००० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये मिळतात. आतापर्यंत १५ हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून लाभार्थी 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी एक आनंदवार्ता असून 16 हप्ता 28 फेब्रुवारी, 2024 रोजी जमा करण्यात येणार आहे.

या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. पीएम किसानच्या संकेतस्थळानुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ओटीपी आधारे ई-केवायसी, पीएम किसान पोर्टलवर करता येऊ शकते. या बायोमॅट्रिक आधारीत ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्रावर संपर्क साधता येईल.

योजनेसाठी असा करा अर्ज
pmkisan.gov.in या साईटवर जाऊन योजनेचा लाभ घेता येईल
‘किसान कॉर्नर’ पर्यायावर क्लिक करा
‘न्यू किसान रजिस्ट्रेशन’ हा पर्याय निवडा
तुमचे शहर अथवा गावाची निवड करा
आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आणि राज्याची निवड करा
‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा
ओटीपी नोंदवून नोंदणीची पुढील प्रक्रिया करा
नाव, राज्य, जिल्हा, बँक आणि आधारचा तपशील अशी सर्व माहिती भरा
आधार प्रामाणिकरण करुन अर्ज जमा करा
शेतीसंबंधीची माहिती जमा करा
सेव्ह बटणावर क्लिक करा
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल
असे करा eKYC

ओटीपी आधारे करा ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ऐपवर उपलब्ध)
बायोमेट्रिक आधारे ई-केवायसी तुम्ही CSC Center/ SSK वरुन करु शकता
फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी, मोबाईल ऐपवर उपलब्ध आहे.
पैसा आला की नाही खात्यात?

सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.