शरद पवारांना मोठा धक्का ; खरी राष्ट्रवादी अजितदादांचीच, विधानसभा अध्यक्षांकडून निकालाचे वाचन
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२४ । गेल्या अनेक महिनात्यांपासून सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणाच्या सुनावणीच्या निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिला आहे. यावेळी राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी एकूण 5 याचिकांवर निकाल दिला.या प्रकरणात आपण दोन स्वतंत्र निकाल देणार, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या मुद्द्यावर आपण पहिला निकाल देणार आणि त्यानंतर आपण आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देणार असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. मूळ पक्ष कुणाचा हे ठरवल्यानंतर आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निर्णय देणार, असं नार्वेकर निकाल वाचन करत असताना म्हणाले. राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.
संख्याबळाच्या आधारावर निकाल देणार असल्याचं यावेळी विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. संख्याबळ पाहिलं तर अजित पवार यांच्या गटाकडे जास्त संख्याबळ आहे. पक्षाच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही”, असं राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.