जळगाव जिल्हाराजकारण

नाथाभाऊ भाजपमध्ये पुन्हा परतरणार? मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : 13 फेब्रुवारी 2023 : गेल्या जवळपास तीन वर्षांपूर्वी भाजपला रामराम करत जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र आता एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत भाष्य केले आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. पण अद्याप पक्षाच्या नेत्यांकडून मला याबाबत विचारणा झालेली नाही.

मला वाटतं तसं काही प्रयोजन नाही. मला अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.

गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा सुरु आहे. एकनाथ खडसे यांची भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी बोलणी सुरु असल्याचे कळते. परंतु, अद्याप पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दाखवला नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खडसेंची घरवापसी रखडल्याची चर्चा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button