⁠ 
रविवार, मे 19, 2024

भाजपचा मास्टर स्ट्रोक! काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला भारतरत्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२४ । काही दिवसापूर्वी लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला होता. यानंतर आज शुक्रवारी केंद्रातील मोदी सरकारने तीन जणांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यात माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली.

ट्विटरवरून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले.आपल्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती त्यांनी केलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. भारतरत्न देऊन सन्मानित केले जात असून हे आमच्या सरकारचे भाग्य आहे.