मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटले अन्.. पुढे जे घडलं ते धक्कादायकच
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२४ । जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ट्रॅक्टरमधून लाकडे घेऊन जातांना मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. यामुळे वेगात असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर थेट तापी नदीत कोसळले. या झालेल्या अपघातात ट्रॅक्टरच्या खाली दाबला जाऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला.
नांद्रा (ता. जळगाव) येथील वासुदेव गोपीचंद सपकाळे (वय ४५) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. दम्यान ८ फेब्रुवारीला दुपारी वासुदेव सपकाळे हे त्यांच्या मामीच्या दशक्रिया विधीसाठी ट्रॅक्टरमध्ये लाकडे भरून नांद्रा गावाकडे तापी नदीच्या रोडने येत होते. या दरम्यान दुपारी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. अचानकच्या हल्ल्यामुळे त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट तापी नदीत कोसळले.
हि घटना घडली यावेळी गावातील तरुण अजय सोनवणे नदीकाठावरील विहिरीजवळ काम होता. त्याच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी गावातील तरुणांसह नदीकाठी पोहोचले. त्यांनी ट्रॅक्टरच्या खाली दाबला गेलेल्या वासुदेव यांना बाहेर काढले. मात्र वासुदेव सपकाळे ट्रॅक्टर खाली दाबले गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला.