आजी/माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुका समितीच्या बैठका
जळगाव लाईव्ह न्यूज । 6 फेब्रुवारी 2024 । जळगाव जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता पिता व सेवेत कार्यरत सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांचे विविध प्रश्न / अडी-अडचणी सोडविण्याकरिता तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना बद्दल माहिती देण्यासाठी ८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२४ कालावधीत तहसील कार्यालयात तालुका समितीच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांचा माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी आहे.
चाळीसगाव तहसील मध्ये ८ फेब्रुवारी, पाचोरा तहसील ९ फेब्रुवारी, भडगाव तहसील १३ फेब्रुवारी, बोदवड तहसील १४ फेब्रुवारी, मुक्ताईनगर तहसील १५ फेब्रुवारी, चोपडा तहसील १६ फेब्रुवारी, धरणगाव तहसील २० फेब्रुवारी, भुसावळ तहसील २१ फेब्रुवारी, यावल तहसील २२ फेब्रुवारी, रावेर तहसील २३ फेब्रुवारी, अमळनेर तहसील २७ फेब्रुवारी, जामनेर २८ फेब्रुवारी, जळगाव २९ फेब्रुवारी २०२४ एरंडोल तहसिल १ मार्च, पारोळा तहसील ०५ मार्च बैठका होणार आहेत. या सर्व बैठका सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालयात पार पडणार आहेत.