धक्कादायक : भुसावळात युगलाने संपविले जीवन?
जळगाव लाईव्ह न्यूज | 4 फेब्रुवारी 2024 | भुसावळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज भालेराव (वय २३) आणि काजल गौतम सपकाळे (वय २०) असं मृतांचे नाव आहे. दोघांनी प्रेम संबंधातून जीवन संपविल्याची चर्चा असून या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील काजल सपकाळे या तरुणीने विषारी द्रव प्राशन केल्याने तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले.
काजलच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर काही वेळाने टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव याने देखील थेट तापी नदीचा पुल गाठून तेथून खाली उडी मारत आपली जीवनयात्रा संपविली. नदी पात्रातून बाहेर काढले असता कुणाल गंभीर जखमी होता मात्र रुग्णालयात घेऊन जाताना त्याचा मृत्यू झाला. दोघांनी प्रेम संबंधातून जीवन संपविले असल्याची चर्चा आहे.