जळगाव लाईव्ह न्यूज । 1 फेब्रुवारी 2024 । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प 2024 सादर केला असून यावेळी त्यांनी ट्रेन्सच्या डब्ब्यांसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.आज वंदे भारत ट्रेन आरामदायक सुविधांसाठी ओळखली जाते. या ट्रेन्समध्ये जसे डब्बे आहेत, तसे अन्य ट्रेन्सचे 40 हजार डब्बे बनवण्यात येतील अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या तीन मोठ्या कॉरिडॉरची सुद्धा त्यांनी घोषणा केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तीन मोठ्या रेल्वे आर्थिक कॉरिडॉरची घोषणा केली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये डब्ब्यांचा जो दर्जा आहे, त्या तोडीचे अन्य ट्रेन्सचे डब्बेही बनवण्यात येतील अशी घोषणा सीतारमण यांनी केलीय. आता रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर करण्यात येत नाही. मुख्य अर्थसंकल्पामध्येच रेल्वे बजेटचा समावेश करण्यात आलाय. आर्थिक विकासासाठी भारतीय रेल्वे महत्त्वाची असल्याच निर्मला सीतारमण म्हणाल्या. सुरक्षा, पायाभूत सोयी-सुविधांच्या सुधारणा, नवीन ट्रेन्स लॉन्च आणि रेल्वे स्थानकांचा कायापालट याकडे बजेट 2024 मध्ये लक्ष देण्यात आलय.
ऊर्जा, खनिज, सिमेंट कॉरिडॉर
बंदराना जोडणारे कॉरिडोर
हाय ट्रॅफिक कॉरिडोर
पीएम गती शक्ती उपक्रमातंर्गत या कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार आहे. हाय ट्रॅफिक कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेन्सच संचालन अधिक गतीने आणि सुरक्षितपणे होईल. सेमी हाय-स्पीड ट्रेन्सची संख्या आणखी वाढवली जाईल. वंदे भारत ट्रेनमध्ये एअर कंडिशन आहे. पण चेअर कार सर्व्हीसचा विचार करता लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी या ट्रेन्स उपयुक्त नाहीयत. भारतीय रेल्वे आता वंदे भारत स्लीपर ट्रेन्स सुरु करण्याचा विचार करत आहे. राजधानी एक्स्प्रेसपेक्षा या ट्रेन्स जास्त आरामदायक आणि सुविधाजनक असतील.