जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२४ । 1 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजेच आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहेत. बजेट सादर होण्यापूर्वीच महागाईचा भडका उडाला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.
प्रत्यक्षात 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर तेल विपणन कंपन्यांमुळे महाग झाला आहे. IOCL च्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 14 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत, त्यानंतर राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769.50 रुपये झाली आहे. नवे दर आज 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत. मुंबईत पूर्वी 1708 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलेंडर आता 1723 रुपयांना मिळणार आहे.
घरगुती सिलेंडरच्या दरांत बदल नाही
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली असली तरी घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र स्थिर आहेत. 14.2 किलो LPG सिलेंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे.