मूलबाळ होत नसल्याने सुरु होता छळ ; विवाहितेन नको ते पाऊल उचललं
चोपडा । मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून छळ सुरु होता. या छळाला कंटाळून २४ वर्षीय विवाहितेने विषारीद्रव्य सेवन करून आत्महत्या केली. ही घटना चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. वर्षा गणेश सूर्यवंशी असं मयत विवाहितेचं नाव असून याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत असे की, कुसुंबा येथील वर्षा हिचे ३ वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिला मूलबाळ होत नसल्याने घरात वाद होत होते. यात १८ तारखेलाही पती-पत्नी आणि सासू यांच्यात वाद झाला. या जाचाला कंटाळून वर्षाने विषारीद्रव्य सेवन करून आत्महत्या केली.
याप्रकरणी सुनील मांगू पाटील (४७) यांच्या फिर्यादीवरून पती गणेश उर्फ परेश संजय सूर्यवंशी (२९), सासरे संजय आत्माराम सूर्यवंशी (५३), सासूरेखाबाई संजय सूर्यवंशी (४८, तिघे रा. कुसुंबा), नणंद माधुरी पाटील (३२, रा. करजगाव ता. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत वर्षा हिच्यावर १९ रोजी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन कुसुंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पती, सासरा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे,