जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२४ । केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असून यात पीएम किसान मानधान योजना (PM Kisan Mandhan Yojana) ही अल्प आणि अत्यलप भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला काही आर्थिक मदत मिळते. आज आपण या योजनेबाबत जाणून घेऊया..
पीएम किसान मानधान योजनाअंतर्गत ६० वर्षांनंतर घरी असलेल्या शेतकऱ्यांना दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत जर कोणत्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला पेन्शनची ५० टक्के रक्कम मिळते. ही पेन्शन फक्त पती आणि पत्नीसाठीच लागू आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे मुलांना मिळत नाहीत. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात.
पीएम किसान मानधन योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मासिक पेन्शन देते. यामध्ये वयाची ६० वर्ष ओलांडल्यानंतर तुम्हाला दरमहिना ३ हजार रुपये मिळेल. एका वर्षात तुम्हाला ३६ हजार रुपये मिळतील. या योजनेत शेतकऱ्याच्या वयानुसार पैसे जमा करावे लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान ५५ ते २०० रुपये जमा करावे लागतील. हे पैसे शेतकऱ्याच्या वयाच्या आधारावर जमा करावे लागतात. जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ५० टक्के म्हणजेच महिन्याला १५०० रुपये मिळतील. आतापर्यंत या योजनेत तब्बल १९.४७,५८८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. याबाबत मनी कंट्रोलने अहवाल दिला आहे.
तुम्हालाही जर पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यासाठी अर्ज करावा लागेल. ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमी आहे. तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे.