आजपासून मारुती सुझुकीची कार महागली; सर्व वाहनांच्या किंमतीत वाढ
जळगाव लाईव्ह न्यूज । 16 जानेवारी 2024 । मारुती सुझुकीची कार (Maruti Suzuki car) घेण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्यासाठी झटका देणारी बातमी आहे. कंपनीच्या कारच्या किंमतीत वाढ होणार आहे.आज म्हणजेच १६ जानेवारीपासून मारुती सुझुकीच्या सर्व वाहनांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.याबाबत कंपनीने आधीच माहिती दिली होती.
कंपनीच्या सर्व मॉडेलची सरासरी किंमत ०.४५ टक्क्यांनी वाढली आहे. ही किंमत दिल्लीतील मॉडेल्सची सरासरी किंमतींवर आधारित आहे. खर्च वाढल्याने कंपनीच्या किंमती वाढल्या आहेत, असे कंपनीने सांगितले आहे.
मारुती सुझुकी कंपनीने जानेवारी २०२४ मध्ये आपल्या सर्व कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. महागाई आणि वस्तूंच्या वाढलेल्या किंमती यामुळे कंपनी कारच्या किंमती वाढवत आहेत. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मारुती सुझुकी कंपनीने मागील वर्षी १ एप्रिल रोजी तिच्या सर्व वाहनांच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा एक्स शोरुमच्या किंमतीवर ०.४५ टक्यांनी वाढ केली आहे.
मारुती सुझुकी कंपनीने २०२३ मध्ये जवळपास एकूण १३७,५५१ युनिट्स विकल्या होत्या. तर डिसेंबर २०२२ मध्ये १३९,३४७ युनिट्स विकले गेले होते. त्यामुळे २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये कंपनीने कमी युनिट्स विकल्या आहे.