⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : 4 जानेवारी 2023 : सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (२०, रा. जामुनझिरा, ता. यावल) याला भुसावळ विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

नेमका प्रकार काय?
यावल तालुक्यातील एका गावामध्ये ८ ऑगस्ट २०२० रोजी अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला याच्याविरुद्ध ‘पोक्सों’तर्गत यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सरकार पक्षाकडून ११ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने रोहनसिंग बारेला याला दोषी ठरवत भादंवि ३६३ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, भादंवि कलम ३७६(१), ३७६ (२), (एफ) (आय) तसेच पोक्सो कायदा कलम ४ व ६ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, कलम ३५४ (अ) व पोक्सो कायदा कलम ८ व १२ अन्वये ३ वर्षे कैद व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अॅड. मोहन देशपांडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी भीमदास हिरे यांनी तर केस वॉच म्हणून अनिल पाटील, एजाज गवळी यांनी मदत केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.