⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पत्नीच्या निधनानंतर अडीच तासांतच पतीनेही घेतला जगाचा निरोप, जळगावातील दुर्दैवी प्रकार

पत्नीच्या निधनानंतर अडीच तासांतच पतीनेही घेतला जगाचा निरोप, जळगावातील दुर्दैवी प्रकार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : 4 जानेवारी 2023 : ८१ वर्षीय पत्नीच्या निधनाचा शोकही रोखू शकले नाहीत आणि सहचारिणीची सोबत हरपली म्हणून दुःखही लपवायला विसरले नाहीत. म्हणून तर दैवालाही या आनंददायी दाम्पत्याचा विरह सहन होऊ शकला नाही. पत्नीच्या निधनानंतर अडीच तासांतच पतीनेही जगाचा निरोप घेतला. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीत ८६ वर्षीय शालिग्राम दामू पाटील (विसपुते नेरीकर) यांचे कुटुंब वास्तव्यास, शालिग्राम पाटील यांनी मायमाती पूजण्यातच आयुष्य शालिग्राम व प्रमिलाबाई पाटील घालविले. शेतीशी एकनिष्ठ असणाऱ्या पाटील यांचा मुलगा किशोर तिकडे सराफी व्यवसायात पाय रोवत गेला. पाच लेकींचा विवाहानंतर संसार गुण्यागोविंदाने सुरू असतानाच या रावळासाठी ‘बुध’वार ‘घात’वार ठरला.

सकाळी साडेअकरा वाजता प्रमिलाबाई शालीग्राम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सहचारिणीच्या निधनाने शालिग्राम पाटील यांना धक्काच बसला. प्रमिलाबाईंचं एकटं जाणं त्यांच्या मनाला फारच खुपलं. मुलगा किशोर, सून, नातवंडांसह पाचही लेकी माय हरपली म्हणून दुःखात बुडाले. तिकडे शालिग्राम पाटील दुःख पचवत बसले. दुपारी २ वाजता त्यांना हृदयविकाराने हेरले. प्रमिलाबाईंना सोबत करण्यासाठी तेही इहलोकीच्या प्रवासाला निघाले.

दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रमिलाबाई आणि शालिग्राम पाटील यांच्यावर आज गुरुवारी सकाळी १० वाजता मेहरुण स्मशानभूमीत अखेरचा निरोप द्यायचे ठरले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.