बातम्या

प्रभासच्या ‘सालार’चा धमाका ; दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर, एकदा आकडा वाचाच

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२३ । साऊथचा सुपरस्टार प्रभासचा नुकताच ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ (Salaar Movie) हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 95 ते 97 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे.

रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही ‘सालार’ने आपल्या कमाईने खळबळ उडवून दिली आहे. जे सांगते की प्रभासचा चित्रपट यावर्षी अनेक रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे. सालारला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या सगळीकडेच प्रभासच्या चाहत्यांमध्ये सालारची क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत.

या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देखील दमदार कमाई केल्यानंतर रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही ‘सालार’ने आपल्या कमाईने खळबळ उडवून दिली आहे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट शाहरुख खानच्या डंकीला टक्कर देत आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ‘सालार’ने कमाईत मोठी झेप घेतली आहे.

‘सालार’ ने सर्व भाषांमध्ये 55 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 90.70 कोटींची कमाई केली. दोन दिवसांत या चित्रपटची एकूण कमाई 145.70 कोटी झाली आहे. प्रभासच्या ‘सालार’ने पहिल्या दोन दिवसांत ज्याप्रकारे धमाकेदार व्यवसाय केला आहे. त्यावरून हा चित्रपट ओपनिंग वीकेंडला बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांपार कमाई सहज करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button