⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | गुन्हे | चोपड्यानजीक अपघातात विद्यमान उपसरपंचाच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, दोघे गंभीर

चोपड्यानजीक अपघातात विद्यमान उपसरपंचाच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, दोघे गंभीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२३ । जीममधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला बसने धडक दिल्याने यात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चोपड्यानजीक घडली. तर या अपघात इतर दोघे विद्यार्थी जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रूपेश तुळशीराम कोळी (१७) असे ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी जीम आटोपून तिघे चहार्डीकडे निघाले होते. वाटेत समोरून येणाऱ्या बसची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यामुळे तिघेही जण दूर फेकले गेले. तिघांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रूपेश कोळी या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला शहरातीलच एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र, त्या ठिकाणी उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

तर या अपघात भावेश मोहन सोनवणे (१७) आणि साहिल शकील पिंजारी (१९, तिघे रा. चहार्डी, ता. चोपडा) हे दोघे देखील जखमी झाले आहेत. साहिल व भावेश या दोघांच्या पायास फ्रैक्चर झाले आहे. साहिल यास जळगावला तर भातेश याच्यावर चोपडा येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान या अपघातातील मयत विद्यार्थी हा चहार्डीच्या माजी सरपंच संगीताबाई कोळी व विद्यमान उपसरपंच तुळशीराम कोळी यांचा धाकटा मुलगा आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.