जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । मागील गेल्या तीन चार दिवसापासून जळगावातील सुवर्णबाजारात सोन्याचे दर स्थिर आहे. आज सोमवारी देखील सोन्याचे भाव जैसे थे चं आहे. तर
चांदी देखील स्थिर आहे.
जळगावातील सराफ बाजारात मागील गेल्या महिन्याभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आली आहे. गेल्या एका आठवड्यात चांदीच्या दरात तर ५ हजार ४०० रुपयाने महागले आहे. तर सोन्याच्या किंमतीत देखील काहीसा वाढ झाली आहे.
सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९०७ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,०७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,७३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
आज १ ग्राम चांदीचा भाव आज ७६.०४ रुपये इतका असून १ किलोचा दर ७६.४०० रुपये इतका आहे.