⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

सेन्सेक्ससह निफ्टीने रचला आणखी एक इतिहास ; नवा उच्चांक गाठला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२३ । आरबीआयचे धोरण दर जाहीर होण्यापूर्वी भारतीय बाजारातील सेन्सेक्ससह निफ्टीने आणखी एक इतिहास रचला आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्ससह निफ्टी वाढीसह व्यवहार करत आहे. यामुळे नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्स 80 हजाराच्या अगदी जवळ आला असून निफ्टी देखील 21 हजाराच्या उंबरवठ्यावर पोहोचली आहे.

आज शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सेन्सेक्सने 295 च्या वाढीसह 69817.38 वर व्यवहार करत आहे. दुसरीकडे निफ्ट बँक 86 च्या वाढीसह 20988.00 वर व्यवहार करत आहे. यापूर्वी 4 डिसेंबर 2023 रोजी सेन्सेक्सने 68918 हा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.

हा विक्रम ५ डिसेंबरला म्हणजे दुसऱ्याच दिवशी मोडला. सेन्सेक्सने 69381 हा नवा उच्चांक गाठला होता. त्यानंतर आज 8 डिसेंबरला सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात वाढीसह व्यवहार केल्यांनतर नवा विक्रम केला आहे.