जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२३ । महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी महापालिकेच्या १९ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले. प्रशासकीय कार्यकाळात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात बदल झाले.
यात सुनील गोराणे यांच्याकडे नगरसचिवपदाचा कार्यभार कायम ठेवून कार्यालय अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. उपायुक्तांचे स्वीय सहाय्यक दीपक फुलमोगरे यांना आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकांची जबाबदारी सोपविण्यात आली. तर प्रभाग तीनचे प्रभाग अधिकारी लक्ष्मण सपकाळे यांची महिला व बालकल्याण अधीक्षकपदी बदली करण्यात आली. त्यांच्याकडे आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिकाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. सतीश शुक्ला यांना प्रभाग समिती तीनचे प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
त्यांच्याकडे विद्युत विभागाचा अतिरिक्त कार्यभार कायम आहे. लेखा विभागातील भाऊसाहेब बागूल, सुजीत चौधरी यांची आस्थापना विभागात बदली करण्यात आली असून, आस्थापना विभागातील राहुल सुशीर यांची लेखा विभागात बदली करण्यात आली.
मनोहर दाभाडे यांची किरकोळ वसुली विभागातून लेखा विभागात, योगेश कोळी यांची आयुक्त कार्यालयातून उपायुक्त कार्यालयात, सुशील बोरसे यांची आयुक्त कार्यालयातून उपायुक्त कार्यालयात, शेख फहीम यांची नगरसचिव कार्यालयातून लेखा विभागात, संतोष सपकाळे यांची उपायुक्त कार्यालयातून सहाय्यक आयुक्त कार्यालयात, जया केदार यांची बारनिशी विभागातून आस्थापना विभागात, नलू दंदी यांची किरकोळ वसुली विभागातून विवाह नोंदणी विभागात, चंद्रशेखर जोशी यांची बांधकाम विभागातून बारनिशी विभागात, विजया हटकर यांची विवाह नोंदणी विभागातून आस्थापना विभागात बदली करण्यात आली.
भोजराज काकडे यांना प्रभाग समिती एकप्रमाणे किरकोळ वसुलीत अतिरिक्त कार्यभार, तर राजू कोळी यांना कार्यालय प्रमुखाचा कार्यभार सांभाळून अभिलेखा विभागातील अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागेल.