तृतीयपंथी, माध्यम छायाचित्रकारांना महिनाभराचा किराणा भेट
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असून माध्यम छायाचित्रकार आणि तृतीयपंथी बांधवांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, इनरव्हील क्लब ऑफ बॉम्ब बायव्ह्यू आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सतर्फे माध्यम छायाचित्रकार व तृतीयपंथी बांधवांना महिनाभर पुरेल असा किराणा भेट देण्यात आला.
दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या पोस्टल कॉलनीतील कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रमात औपचारिकता म्हणून काही किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, चेतन वाणी, प्रवीण चौधरी, विनोद शिरसाळे, जयश्री पटेल, रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सचे अध्यक्ष धनराज कासट, सागर मुंदडा, जिनल जैन, निरज अग्रवाल, राहुल कुकरेजा आदी उपस्थित होते.
इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बायव्ह्यूच्या अध्यक्ष स्मिता झुंझूनवला, रजनी बसेरिया यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले आहे. लॉकडाउन काळ असेपर्यंत उडाणच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्तींना मदत पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. किराणा किटमध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ डाळ, चहा, साखर, तिखट, हळद, तेल, साबण, कांदा, बटाटे, टूथपेस्ट, सॅनिटायझर, फरसाण, मास्कचा समावेश आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/936749797164428/