राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये होणार वाढ; इतक्याने वाढेल पगार?
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२३ ।तुम्हीही जर राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहेत. राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे.
त्यानुसार १ जुलै पासून राज्य शासकिय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिन कर्मचार्यांच्या वेतनात ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्याचा दर ४२% हून ४६% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर २०० कोटींचा बोजा पडणार आहे.
थकबाकीही मिळणार
दरम्यान, सरकारने हा महागाई भत्ता १ जुलै २०२३ पासून करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच हा महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ पासून ते ३१ आक्टोंबर २०२३ या कालावधतील थकबाकीसह नोव्हेंबर २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे, असं शासन निर्णयात म्हटलं आहे.