⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | प्रवाशांनो दिलासा! भुसावळमार्गे पुणे-अमरावती विशेष एसी एक्स्प्रेस धावणार

प्रवाशांनो दिलासा! भुसावळमार्गे पुणे-अमरावती विशेष एसी एक्स्प्रेस धावणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२३ । सणासुदीत भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याच दरम्यान, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्ष्यात घेऊन रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या चालविल्या जात असून अशातच मध्य रेल्वेने प्रशासनाने पुणे ते अमरावती या दोन स्थानकांदरम्यान विशेष एसी चेअर कार विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही भुसावळमार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्र. ०११०१ पुणे-अमरावती एक्स्प्रेस शुक्रवार १० नोव्हेंबर ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पुणे स्थानकावरून दररोज सकाळी ११:०५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता अमरावती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०११०२ अमरावती-पुणे एक्स्प्रेस शनिवार, ११ नोव्हेंबर ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अमरावती स्थानकावरून दररोज रात्री १०:५५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे.

या स्थानकांवर असेल थांबा?
अप व डाऊन मार्गावरच्या या गाड्यांना उरूळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, चाळीसगांव, काजगांव, पाचोरा, जळगांव , भुसावळ, मलकापुर, शेगांव, अकोला, बडनेरा स्थानकांवर थांबा असणार आहे. एलएचबी कोचसह धावणाऱ्या या विशेष रेल्वेला १७ डबे असून, द्वितीय श्रेणी चेयर कार १३, एसी चेयर कार श्रेणी ०१, स्लीपर श्रेणी ०१, द्वितीय श्रेणी व एसएलआर ०२ अशी संरचणा असणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.