⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | एकनाथ खडसेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; वाचा सविस्तर

एकनाथ खडसेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : ९ नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना छातीत दु:खत असल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल होते. आता, त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांनी पेपर वाचतानाचा स्वत:चा फोटो शेअर केला आहे. खडसेंनी स्वत:च्या प्रकृतीबद्दल अपडेट देत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आमदार एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत असल्याने ४ दिवसांपूर्वी त्यांना जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रविवारी रात्री त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर पुढील तपासण्या झाल्या. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती. आता, त्यांनी स्वत: प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. तसेच, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र, आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद !
महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !, असे ट्विट एकनाथ खडसे यांनी केले आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.