⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | प्रवाशांसाठी खुशखबर ! भुसावळमार्गे धावणाऱ्या काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ

प्रवाशांसाठी खुशखबर ! भुसावळमार्गे धावणाऱ्या काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२३ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. आगामी सणासुदीत होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेकडून काचीगुडा-लालगढ-काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.

या विशेष रेल्वेची शेवटची फेरी २८ व ३१ ऑक्टोबरपर्यंत होती. मात्र दक्षिण-मध्य रेल्वेने या गाडीला मुदतवाढ देत ती आता २५ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०७०५३ काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे २५ नोव्हेंबरपर्यंत काचीगुडा येथून प्रत्येक शनिवारी रात्री २१:३० वाजता सुटेल आणि लालगढ जंक्शनला सोमवारी दुपारी १३:३५ वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७०५४ लालगढ-काचीगुडा विशेष रेल्वे लालगढ येथून प्रत्येक मंगळवारी रात्री १९:४५ वाजता सुटेल आणि काचीगुडाला गुरुवारी सकाळी ०९:४० वाजता पोहोचेल. पूर्वाश्रमीची काचीगुडा-बिकानेर गाडीचा विस्तार गेल्या महिन्यात बिकानेरपासून पुढे असलेल्या लालगढ स्थानकापर्यंत करण्यात आला आहे.

या स्थानकांवर आहे थांबा
काचीगुडा येथून मेडचल, वाडियाराम, कामरेड्डी, निजामाबाद, बसर, मुदखेड जं., नांदेड, पूर्णा जं., बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ जं., जळगाव जं., नंदुरबार, जं. सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, अबू रोड, फलना, मारवाड जंक्शन, पाली मारवाड, लुनी, जोधपूर, गोतान, मेडता रोड, नागौर आणि नोखा या स्टेशनवर थांबेल

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.