जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२३ । जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच चोरट्यांनी ज्वेलर्स दुकान फोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना पाचोरा तालुक्यातील लोहारा गावात घडली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, विशाल शंकर सोनवणे (वय-३२) रा. पहूर ता.जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे पाचोरा तालुक्यातील लोहारा गावात ओमसाई ज्वेलर्स शॉप नावाचे दुकान आहे. २७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान त्यांचे दुकान बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ८ हजारांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागने असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
हा प्रकार २८ ऑक्टोबर रोजी समोर आला. त्यांनी नजीकच्या पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरविंद्र मोरे करीत आहे.