जळगाव जिल्हा

महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड, पण राज्यासह जिल्ह्यात पावसाचा अंदाज? कधीपासून..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२३ । राज्यात वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. मागील काही दिवसापूर्वी ऑक्टोबर हिटमुळे जळगावसह राज्यातील अनेक शहरांचे तापमान वाढल्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. मात्र आता उन्हाच्या कडाक्यातून जळगावकरांना दिलासा मिळू लागला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगावात नोंदवले गेले.

जळगावमध्ये गेल्या काही दिवसापासून रात्रीच्या तापमानात मोठी घट होत असून बुधवारी या हंगामातील सार्वधिक कमी म्हणजेच १३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. जळगावपेक्षा महाबळेश्वरचे तापमान अधिक होते. महाबळेश्वरचे तापमान १६. ८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. राज्यात इतर ठिकाणी तापमान सरासरीच्या जवळपास होते.

जळगाव शहर हॉट सीटी म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात अनेक वेळा जळगावचे तापमान राज्यात सर्वाधिक असते. यंदा परतीच्या पावसाने माघारी घेताच जिल्ह्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला होता. उकाड्यात वाढ झाल्याने जळगावकर चांगलेच घामाघूम झाले होते. मात्र आता जळगावचे तापमान नीच्चांकावर आले आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगावचे नोंदवण्यात आले.

सध्या पहाटे सकाळच्या वेळीस थंडी जाणवत असून आगामी काही दिवसात तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

दिवाळीदरम्यान राज्यासह जिल्ह्यात पावसाचा अंदाज
दरम्यान, एकीकडे आता जिल्ह्यातील तापमानात घट होऊन, गुलाबी थंडीची चाहूल लागू लागली आहे. मात्र, दिवाळीदरम्यान राज्यासह जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन वादळाची स्थिती. निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात ‘तेज’ हे चक्रीवादळ निर्माण झाले होते. मात्र, या वादळाची दिशा ओमानकडे होती. त्यामुळे या वादळाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रावर झाला नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button