⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ आठ महत्त्वाचे निर्णय

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ आठ महत्त्वाचे निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२३ । शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत सरकारच्या वतीने आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. वाचा नेमके कोणकोणते निर्णय घेतले.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार (वित्त विभाग)
महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार (सामाजिक न्याय)
राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार (सहकार व वस्त्रोद्योग)
कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.(ऊर्जा विभाग)
इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार (कामगार विभाग)
बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण (सामाजिक न्याय)
राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार (विधी व न्याय विभाग )
अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय (पशुसंवर्धन विभाग)

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.