जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ । जळगाव एमआयडीसीतील महेश प्लास्टिक कंपनीत ३० हजार रुपयाची चोरी झाल्याची घटना १५ मे रोजी घडली होती. दरम्यान, याबाबत एकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत असे की, जळगाव एमआयडीसीतील सेक्टर नं.व्ही ५८ मधील महेश प्लास्टिक कंपनीत अरविंद उर्फ आरव अरुण वाघोंदे (वय.२४ मु.रा.कोली-कोल्हार ता.मोताळा, जि.बुलढाणा, हल्ली मु हरी विठ्ठल नगर जळगाव) याने गेटवरून कुदून कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या गोडावूनचे शटरचे कुलूप तोडून कंपनीच्या प्लांटमध्ये येवून चोरी केली. ही घटना १५ मे रोजी घडली होती.
त्यात ८ हजार किंमतीचा सोनी कंपनीचा २४ इंच टीव्ही. ७ हजाराचा एवेक कंपनीचा सीसीटीव्ही कॅमेराचा डिव्हीआर, ५ हजाराचा एच पी कंपनीच्या दोन नग लूम मोटर, ३ हजाराचा एम क्रोमटन कंपनीची लूम मोटर, ४ हजार रुपयाची एक गेअर मोटर व तीन हजार रुपयाची रोख रक्कम असा एकूण ३० हजाराचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, चोरीस गेलेला माल हा सैय्यद मुश्ताक सैय्यद हसन (वय ३७ रा.अक्सा नगर मेहरूण) यास विकला होता. सय्यद यास पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी इमरान सैय्यद चेतन सोनवणे मुदस्सर काजी यांनी ताब्यात घेतले होते त्यास आज रोजी न्यायमूर्ती अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला दिनांक २४ मेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असून त्याने चोरीचे साहित्य खरेदी केले होते पहिला आरोपी अरविंद याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे