माहेश्वरी समाजातर्फे वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर मठ्ठा वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ । जळगाव शहर तहसील माहेश्वरी समाज यांच्या विद्यमाने माजी जिल्हा सचिव अँड राजेंद्र महेश्वरी, महेश प्रगती संचालक आशिष बिर्ला, माजी जिल्हा कार्याध्यक्ष अशोक राठी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर गरीब गरजूंना व रुग्णालयातील नातेवाईकांना मठ्ठा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक जळगाव शहर तहसील माहेश्वरी समाजाचे होते.
कार्यक्रमाप्रसंगी माहेश्ववरी समाज शहर तालुका अध्यक्ष योगेश कलंत्री, महेश सचिव विलास काबरा, महेश प्रगतीचे अविनाश जाखेटे, दीपक फापट, कैलास मुंदडा, प्रमोद झंवर, श्यामसुंदर लाठी आदींची उपस्थिती होती.
कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हलाखीची परिस्थिती निर्माण झाली असून माहेश्वरी समाजातर्फे बरीच सामाजिक कामे केली जात आहेत. आज तीन महत्त्वाच्या लोकांच्या वाढदिवसाच्या औचित्याने गरजूंना मठ्ठा वाटप करून गरिब व गरजू जनतेला सामाजिक कार्यात एक छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे योगेश यांनी सांगितले.