⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | बातम्या | होऊन जाऊद्या दिवाळी! खाद्यतेल आणखी स्वस्त, तपासून घ्या एका किलोचा दर..

होऊन जाऊद्या दिवाळी! खाद्यतेल आणखी स्वस्त, तपासून घ्या एका किलोचा दर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२३ । कोरोनाच्या लॉकडाऊन काळात खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेलं होते. मात्र त्यांनतर खाद्यतेलाच्या दरात बरीच घसरण झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, खाद्यतेलाचा दर गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त झालं आहे.

सध्या खाद्यतेलाचे दर स्थिर असून तेलासाठी लागणारा कच्चा माल मुबलक प्रमाणात असल्यामुळे दिवाळीमध्ये देखील तेलाचे भाव स्थिर राहणार आहे. जास्त मागणी वाढल्यास किंचित १ ते २ रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे.

मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक बाजारात सोयाबीन तेलाच्या एका पाऊचची किंमत १२० ते १२३ रुपयापर्यंत होते. तर खुले एक किलो तेलाचा दर जवळपास १२६ ते १३० रुपये इतके होते. परंतु सध्या (आजच्या दिवशी) सोयाबीन तेलाच्या एका पाऊचची किंमत ९६ ते ९९ रुपये इतकी आहे. तर खुले एक किलो तेलाचा दर १०५ ते ११० रुपयापर्यंत विकला जात आहे. म्हणजेच वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास २५ ते ३० रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

दिवाळीपर्यंत भाव वाढणार की कमी होणार?
महिनाभरापूर्वी खाद्यतेलासह डाळींच्या भावात मोठी वाढ झाली होती. सर्वसामान्यांना वाढत्या महागाईचे चटके सहन करावे लागत असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारविरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे. इंधनाचे दर कमी होत नसल्यामुळे त्याचा परिणाम दळणवळण व्यवस्थेवर झाला आहे. या महागाईत तेलाचे भाव सध्या कमी असून दिवाळीत देखील भाव कमीच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

म्हणून तेल झाले स्वस्त
तेलासाठी लागणारा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आगामी दसरा, दिवाळी सण लक्षात घेता उत्पादनातही वाढ झाली आहे. बाजारात खाद्यतेलाची आवक वाढली आहे. या सर्व बाबी पाहता कंपन्यांनी खाद्यतेलाचे दर कमी केले आहेत.

असे आहेत दर?
सोयाबीन – १०५ ते ११० रुपये प्रति किलो
शेंगदाणा – १८० ते १९० रुपये प्रति किलो
पामतेल – ९१ ते ९६ रुपये प्रति किलो
तीळ – २३५ ते २४० रुपये प्रति किलो
सरसो – १८० रुपये प्रति किलो

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.