---Advertisement---
गुन्हे यावल

चितोडा येथील तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी दोन महिलांसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२३ । यावल तालुक्यातील चितोडा येथील दुर्गेश संतोष किनगे या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार दोन महिलांसह ५ जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

durgesh kinge chitode jpg webp

नेमकी घटना काय?
चितोडा येथील दुर्गेश संतोष किनगे (वय-२३), या तरूणास अज्ञात कारणावरून गावातील भास्कर आनंदा जंगले, रजनी भास्कर जंगले, भूषण भास्कर जंगले, रेखा भूषण जंगले, ज्ञानेश्वर भास्कर जंगले यांनी गुरुवारी सकाळी दुर्गेश संतोष किनगे यास त्याच्या घरासमोर चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करीत तु गावातून निघून जा अशी धमकी दिली.

---Advertisement---

युवकाने घाबरून जात यावल शिवारातील देविदास तुकाराम पाटील यांचे गट नंबर ५५७ चे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. प्रथम गुरुवारी दुपारी चितोडा गावाचे पोलीस पाटील पंकज वारके यांचे खबरी वरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर सायंकाळी उशिरा मयताचे वडील संतोष किनगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित ५ जणांविरुद्ध तरुणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे घटनेचा तपास पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---