जळगावकरांचा पाणी टंचाईचा प्रश्न मिटला ; सलग पाचव्या वर्षी वाघुरने गाठली शंभरी

सप्टेंबर 28, 2023 10:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२३ । वाघुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. सलग पाचव्या वर्षी वाघुर धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे जळगाव शहरासह जामनेर व तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला आहे.

waghur

दरम्यान, सद्यस्थितीत वाघूर धरणाचे २ दरवाजे १० से.मी. ने उघडण्यात आली आहे व त्या द्वारे ६७७ कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे. नदीकाठावरील लोकांनी सावध राहावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन यांनी केले आहे.

यंदा जून व ऑगस्ट महिन्यांत पावसाने पाठ फिरवल्यामुळे वाघूर धरण ६० ते ७० टक्के भरेल अशीच शक्यता होती. यामुळे पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भीती होती. मात्र, या महिन्यात जळगावसह राज्यामधील विविध भागात दमदार हजेरी लावली. यामुळे खरिपाची पिकांना जीवनदान मिळाले असून अनेक धरणांमधील देखील जलसाठ्यात वाढ झालीय.

जळगाव शहरासह जामनेर तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर धरणही १०० टक्के भरले आहे. गेल्या वर्षापेक्षा कमी पाऊस असतानाही, वाघूर धरणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर शंभरी गाठली आहे. गेल्या वर्षी वाघूर धरण २० ऑक्टोबर रोजी १०० टक्के भरले होते

सलग पाचव्या वर्षी हे धरण १०० टक्के भरले असून, धरण तयार झाल्यानंतर १५ वर्षाच्या काळात हे धरण नवव्यांदा १०० टक्के भरले आहे. २०१९ ते २०२३ पर्यंत हे धरण सातत्याने १०० टक्के भरले आहे. २०१७ व २०१८ मध्ये वाघूर धरणच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे जलसाठा २० टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे उन्हाळ्यात जळगावकरांना ३ ते ५ दिवसाआड पाणी मिळत होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now