जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२३ । सोने-चांदीला सप्टेंबर महिन्यात मोठी उसळी मारता आलेली नाही. आगामी सणासुदीत दोन्ही धातूंचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे पुढील महिन्यात नवीन रेकॉर्ड होतो, की किंमतीत घसरण? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, भारतीय सराफा बाजारात आज (मंगळवारी) सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. याआधी सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सराफा बाजारात नरमाई दिसून आली. काल 26 सप्टेंबरला सराफा बाजार लाल चिन्हाने उघडला.Gold Silver Price Today
आजचा मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या-चांदीचे भाव घसरलेले दिसून येत आहे. MCX आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने 0.10 टक्क्यांनी म्हणजेच 58 रुपयांनी घसरून 58,643 रुपये प्रति 10ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदीची किंमत 0.53 टक्क्यांनी म्हणजेच 382 रुपयांनी घसरून 71,768 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 54,350 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 59,400 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 72,8000 रुपयावर आला आहे.
देशातील चार प्रमुख महानगरांमधील सोन्या-चांदीचे दर?
राजधानी दिल्लीत सोन्याचा (22 कॅरेट) भाव 53,863 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 58,760 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर राजधानीत चांदीचा भाव 71,600 रुपये प्रति किलो आहे. मायानगरी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 53,955 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव येथे 71,720 रुपये प्रति किलो आहे.
कोलकातामध्ये सोनं (22 कॅरेट) 53,882 रुपये प्रति दहा ग्रॅम विकलं जातंय, तर इथे 24 कॅरेट सोनं 58,780 रुपये प्रति दहा ग्रॅमनं विकलं जात आहे. कोलकात्यात चांदीचा भाव 71,630 रुपये प्रति किलो आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,102 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार होत आहे. तर चेन्नईमध्ये चांदीची किंमत 71,920 रुपये प्रति किलो आहे.