जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । देशात कौशल्य विकास क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण घ्यावे, असा सल्ला यावलचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे यांनी दिला. यावल येथील श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रदान कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी उपनिरीक्षक अविनाश दहिफळे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशात कौशल्यप्राप्त कामगारांची कमतरता होती. मात्र, गेल्या काही वर्षांत कौशल्य विकास क्षेत्रात विविध महाविद्यालयातून शिक्षण घेऊन तरूण पदवीधर झाले आहे. या पदवीधर तरूणांना देशात कौशल्य विकास क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी आहे. त्यामुळे पुस्तकी ज्ञानासोबत औद्योगिक प्रशिक्षण महत्त्वाचे आहे असे सांगितले.
यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार शेखर पटेल, सोनल कोळी, संस्थेचे प्राचार्य तुषार धांडे, निदेशक योगेश भगवान धांडे, योगेश ठाकूर धांडे, वसीम तडवी, धीरज साळुंके, देवेश धांडे, कांचन सुतार, चारुलता तळेले, लक्ष्मी पारधे उपस्थित होते. यावलला श्री गणेश आयटीआयमध्ये पदवी प्रदान कार्यक्रमाला उपनिरीक्षक अविनाश दहिफळे उपस्थित होते.