भवरलाल अँन्ड कातांबाई जैन फाउंडेशनतर्फे तमाशा कलावंताना किराणा वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । कोरोणाच्या या महामारीत सर्व घटकावंर मोठा परिणाम झाला आहे..परंतु कलेवर पोट असणारा लोककलावंत महामारीत होरपळून निघाला आहे.
या वर्षभराच्या काळात आनेक संकटाचा सामना करीत कोरोनाने उध्वस्त होत चाललेल्या जिल्ह्यातील लोककलावंता स्थिती अत्यंत हलाखीची होत चालली आहे.. लोकरजंनाचे, लोकप्रबोधनाचे अविरत पणे कार्य करणा-या लोककलावंता कडे शासना सोबतच मायबाप रसिकांनी देखील पाट फिरवल्यामुळे लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्हयात सध्य स्थितीत तमाशा मंडळ शाहीरी पथके, वहीगायन कलापथक, वाघ्या मुरळी, गोधळी , वासुदेव, सोंंगाड्या पार्टी, आदी कलाक्षेत्रात कार्यरत लोककलावंत या कोरोना महामारीचा सामना करीत करीत आहे….
या परिस्थितीत लोकलावंताना मदत करण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष अँड रोहीणीताई खडसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जैन उद्योग समुहाचे प्रमुख अशोक भाऊ जैन यानी विस किराना किट खान्देश तमाशा व शाहीर लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आले
आज परोळा येथे 20 तमाशा तमाशा कलावंताना हया किराना किट चे वाटप करण्यात आले अखिल भारतीय नाट्य परिषद व खान्देश तमाशा व शाहीर लोककलावंत विकास परिषदेच्या च्या वतीने सुरू असलेल्या या लोककलावंत मदत अभियानात लोककलावंताच्या घरोघरी जाऊन ही मदत करण्यात येत आहे. अशोक भाऊ जैन यांनी मदत केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आज विस तमाशा कलावंताना करण्यात आले.
या प्रसंगी खान्देश तमाशा परिषदेचे अध्यक्ष शेषराव नाना गोपाळ, नाट्य परिषदेचे कार्यकारणी सद्स संदिप घोरपडे व लोककलावंत मदत अभियानाचे मुख्य समन्वयक विनोद ढगे आदि मान्यवर उपस्थित होते.