⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शेंदूर्णी रासेयो एकका व नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित वेबिणार उत्साहात

शेंदूर्णी रासेयो एकका व नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित वेबिणार उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगांव आणि अ. र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने “मानसिक स्वास्थ्य आणि समुपदेशन : कोरोना आणि त्यानंतर ची परिस्थिती” या महत्वाच्या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. वेबिनारमध्ये देशभरातील तरुण-तरुणींनी सहभाग नोंदविला.

वेबिनारची प्रस्तावना नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर करताना वेबिनारच्या आयोजनामागील भुमिका स्पष्ट केली.

वेबिनारचे प्रमुख उदघाटक संस्थेचे सचिव सतीशचंद्र काशीद यांनी मनोगतात आजकाल कोरोना काळात मानसिक समुपदेशनाची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. तसेच अशा स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे असे मत मांडुन आयोजकांचे कौतुक केले.

‘वेबिनरच्या या प्रथम सत्राचे अध्यक्ष कबचौ, उमवि जळगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा.डॉ.पंकजकुमार नन्नवरे हे होते.

या वेबिनारमध्ये जळगांव मधील मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यात बुधवारी मानसोपचार तज्ञ डॉ.विजयश्री मुठे यांनी आपल्या व्याख्यानातून कोरोना काळात मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा उहापोह केला. त्यांनी आपल्या व्याख्यानातुन सकारात्मक विचार करण्यावर भर देऊन आपल्या नकारात्मक विचारांवर विजय मिळविण्याच्या पध्दतीची माहिती दिली तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या कोरोना विषयी अनेक आधारहीन गोष्टींना पूर्णपणे दुर्लक्षित करण्याचे सूचित केले. त्यांनी आपल्या सत्रात उपस्थितांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. याविषयी स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले.

सत्राच्या शेवटी प्रा.डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात वेबिनारचे महत्व विशद केले व कोरोना काळातील गंभीर परिस्थितीत रासेयोची भूमिका विशद केली.

या प्रथम सत्राचे सुत्रसंचालन रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी. पाटील यांनी केले व रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे यांनी आभार मानले.गुरुवारी पार पडलेल्या द्वितीय सत्रात डॉ.विणा चव्हाण, समुपदेशक यांनी मार्गदर्शन केले.

या सत्राचे प्रास्तविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी केले. त्यांनी प्रस्ताविकात आजच्या परिस्थितीत वेबिनरच्या आयोजनामागील प्रमुख उद्दिष्टे मांडली. या सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील हे होते.

द्वितीय सत्रात डॉ.विणा चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनातून कोरोना काळातील मानसिक स्थिती, मनातील अवाजवी भीती व समुपदेशन या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी मानवी मन ‘फाईट’ व ‘फ्लाईट’ या भूमिकेतून कश्या पद्धतीतुन जाते या विषयी विवेचन केले. तसेच त्यांनी कोरोना काळात मनाच्या नकारात्मक गोष्टींना कमी करता येण्यासाठी योग्य स्वरूपात मार्गदर्शन केले.

 

सत्राच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले. यामुळे स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले. यानंतर स्पर्धकांमधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे रासेयो स्वयंसेवक अमोल सरोदे व पंकज महाविद्यालय चोपडा येथील प्रा.डॉ.संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दोघांनी आपल्या मनोगतातून वेबिनार च्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

 

सत्राच्या शेवटी अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील यांनी  या कोरोना आपत्ती काळाला संपत्ती समजून सामोरे जाणाराच खरा युवा असतो असे प्रतिपादन केले. त्यांनी उपस्थित रासेयो व एनवायके स्वयंसेवकांना ह्या कोरोना आपत्ती काळात मदतीचे आवाहन केले.

या प्रथम सत्राचे सुत्रसंचालन रासेयो  कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे यांनी केले व रासेयो महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील यांनी आभार मानले.

या वेबिनार प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.श्याम साळुंखे, प्रा.डॉ.संजय भोळे तसेच प्रा.सपकाळे, प्रा.डॉ.प्रशांत देशमुख, प्रा.अमर जावळे, प्रा.योगीता चौधरी, प्रा.वर्षा लोखंडे तसेच इतर महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना व नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेबिनारच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवक रविंद्र बोरसे, किरण उर्फ माऊली सुरवाडे, विशाल जिरे, राहुल पाटील, व्यंकटेश उपाध्ये, सचिन कुंभार, सागर तडवी यांनी मेहनत घेतली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.