जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच जळगाव शहरात ट्रॅक चालक तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सागर रमेश पालवे (वय २५, रा. मालदाभाडी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
नेमकी काय आहे घटना?
सागर रमेश पालवे हा अनेक वर्षांपासून ट्रान्सपोर्ट नगरातील विकास लकडे यांच्या विदर्भ ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून कामाला होता.गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी एमआयडीसी परिसरातील नवीन गुरांचा बाजार परिसरामध्ये ट्रान्सपोर्ट नगरात त्याचा काही लोकांसोबत वाद झाला होता.असे समजते त्यानंतर तो झोपायला गेला होता. सकाळी त्याचा संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह आढळून आला. यावेळी ट्रान्सपोर्ट नगरातील काही नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले.यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी रवाना झाले. तसेच रुग्णालयात येऊन त्यांनी माहिती जाणून घेतली. मयत सागर पालवे यांच्या पश्चात आई नीलम, वडील रमेश व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. दरम्यान रात्री त्याचे काही सहकार्यांसोबत वाद झाले होते. त्या वादातूनच त्याचा घात झाला नाही ना अशी चर्चा ट्रान्सपोर्ट नगरात सुरू आहे. दरम्यान पोलीस घटनेची कसून चौकशी करीत असून पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.